Khare Aapey Recipe : रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस मस्त खायचं अन् निवांत झोपायचं असं अनेकांचे नियोजन ठरलेले असतचं. पण रोजच्या रुटीनमध्ये थोडं वेगळ काहीतरी खायची इच्छा ही होतेचं. रविवारचा नाश्ता म्हटलं की काही-काही जणांचे ठरलेले मेनू असतात. जसं की पोहे, इडली, डोसा, अप्पे असे पदार्थ आपण करून खातो. विशेषत: इडली, डोसा आणि अप्पे बनवण्यासाठी थोडी जादा मेहनत करावी लागते. मिश्रण सकाळी भिजवायचं मग रात्री त्याचं वाटण करायचं आणि दुसऱ्य़ादिवशी ते आंबवलेल्या पिठाने मग इडली वगैरे करायचं. पण कधी कधी असं होत. की आपल्याला बेत करायचा असतो पण सकाळी घाई-गडबडीत मिश्रण करायला विसरतो. तुम्हाला जर अस विसरायला होत असेल तर तुमच्यासाठी खारे अप्पे हि डिश नक्कीच फायदेशीर ठरेल. कसे बनवायचे खारे अप्पे जाणून घेऊया.
साहित्य :
जाडा तांदुळ – १ वाटी
मुगाची डाळ- अर्धी वाटी
उडदाची डाळ-पाऊनवाटी
पाऊनवाटीपेक्षा थोडीशी कमी चण्याची डाळ
१ चमचा जीरे, चवीपुरत मीठ
काळीमिरी पावडर
१ चमचा फ्रूट स्लाॅट
कृती :
डाळी आणि तांदूळ एकत्र रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. त्यात मीठ, १ चमचा फ्रूट स्लाॅट, काळीमिरी, जिरे घालून मिक्स करून घ्या. मिश्रण चांगले तयार करून घ्या. आता गॅसवर अप्पेचा तवा गरम करून घ्या. त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून अप्पेचं पीठ घाला. दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. गरम गरम सर्व्ह करा. तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा साॅस सोबत खाऊ शकता.
Previous ArticleSangli Crime: कवठेमहांकाळ पोलिसांकडून ५ तासात आरोपी जेरबंद
Related Posts
Add A Comment