प्रतिनिधी / निपाणी
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकची निवडणूक पार पडली. यामध्ये सर्वांच्या एकजुटीने कर्नाटक काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली. यानिमित्त चिकोडी व बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार करण्यात आला.
काँग्रेसच्या चिकोडी व बेळगाव जिल्हा कार्यक्षेत्रात निवडून आलेल्या आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे खर्गे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी खर्गे यांनीही नवनियुक्त आमदार तसेच पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, राजू सेठ, महेश तमन्नावर, विश्वास वैद्य, महांतेश कौजलगी, बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार शाम घाटगे, सुनील हणमन्नावर, महावीर मोहिते, दयानंद पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.