ऑनलाईन टीम/तरुण भारत
किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि नील सोमय्या (Neil somaiya) यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात (CBI Court) सुनावणी पूर्ण झाली आहे. परंतु मुंबई सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज संध्याकाळपर्यंत सोमय्या पिता-पुत्रांच्या भवितव्याचा फैसला होणार होता. या युक्तिवादा दरम्यान शासना तर्फे सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. दरम्यान सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याप्रकरणातील ती रक्कम कुठे गेली हे शोधण्यासाठी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्या कोठडीची मागणी केल्याची माहिती दिली. तर न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. सोमय्या आणि नील सोमय्या यांचा अटकपूर्व जाणीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.