Kishori Pednekar लोअर परळ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) गोमाता जनता प्रकल्पातील फसवणूकीसंदर्भात पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गटाच्या) नेत्या किशोरी पेडणेकर याच्यासह इतर चार जणांवर फसवणूक आणि बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्राधिकरणाचे अधिकारी उदय पिंगळे यांनी निर्मलनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पेडणेकर यांच्याकडे झोपडपट्टीचा मालकी हक्क नव्हता. किंवा त्यांना याचे वाटप करण्यात आले नव्हते. तरीही, 2017 मध्ये त्यांनी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी गोमाता जनता प्राधिकरण प्रकल्पातील घर त्यांनी आपल्या नावावर असल्याचे दाखवले होते. परंतु ही सदनिका गंगाराम बोगा या नावाच्या व्यक्तीला 2008 मध्ये देण्यात आला होता. प्राधिकरणाच्या नियमानुसार एकदा सदनिका दिल्यावर ती 10 वर्षांसाठी विकू किंवा भाड्याने देऊ शकत नाही. असे तक्रारीत उदय पिंगळे यांनी म्हटले आहे.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी असा ही आरोप केला की, पेडणेकर यांनी स्थापन केलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने २०१२ मध्ये प्राधिकरणाच्या सोसायटीच्या पत्ता कंपनीच्या नोंदणीसाठी सादर केला होता. परंतु गंगाराम वडलाकोंडा या व्यक्तीच्या नावाने या गाऴ्याचे वाटप करण्यात आले होते, त्यामुळे या तक्रारीत पेडणेकर यांच्या फर्मच्या संचालक असलेल्या शैला गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर आणि साईप्रसाद पेडणेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related Posts
Add A Comment