Face powder: पूर्वी चेहऱ्यावर फक्त पावडर लावण्याची पद्धत होती. मात्र आजकाल बाजारात विविध प्रकारच्या फेस पावडर मिळतात.फेस पावडर लावण्यामुळे चेहऱ्यावर घाम येत नाहीच, शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण झाकले जातात.पण कोणती पावडर वापरल्याने काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेऊयात.
बाजारात प्रेस्ड पावडरदेखील सहज मिळतात, ज्यांना आपण कॉम्पॅक्ट असं म्हणतो. स्पंज अथवा ब्रशच्या मदतीने तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावर लावू शकता.मेकअप न करताही तुम्ही फक्त कॉम्पॅक्ट अथवा प्रेस्ड पावडर चेहऱ्यावर लावू शकता.
मेकअपची आवड असणाऱ्या महिलांकडे आजकाल बनाना पावडर असतेच. बनाना पावडर ही पिवळसर रंगाची एक अल्ट्रा फाइन, टोंड पावडर आहे. कन्सिलर आणि फाऊंडेशन सेट करण्यासाठी या पावडरचा चांगला फायदा होतो. डार्क सर्कल्स लपवण्यासाठी बनाना पावडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
लूज पावडर ही एखाद्या डबीत अथवा बॉक्समध्ये मिळते. मेकअप सेट करण्यासाठी ब्रशच्या मदतीने तुम्ही लूज पावडर वापरू शकता. ज्यामुळे तुमचा मेकअप खूप वेळ टिकेल. लाइट कव्हरेज आणि नॅचरल लुकसाठी लूज पावडर लावणं फायद्याचं आहे. लूज पावडर तुमच्या चेहऱ्यावरील तेल आणि घाम शोषून घेते. तेलकट त्वचेच्या लोकांनी लूज पावडर लावणं जास्त फायद्याचं ठरेल.
तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही लूज अथवा प्रेस्ड पावडरऐवजी पावडर फाउंडेशन वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेल निर्मिती जास्त काळ नियंत्रित केली जाते. तेलकट चेहऱ्यावर क्रीम अथवा जेल फाउंडेशन लावण्यापेक्षा हा चांगला पर्याय आहे. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्याला मॅट फिनिश लुक मिळतो.
Previous Articleदसर्या निमित्त धावणार उत्सव स्पेशल रेल्वे
Next Article सौंदत्ती यात्रेसाठी धावणार अतिरिक्त बस
Related Posts
Add A Comment