सैंधव मीठ हे नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. पण बरेच जण फकत उपवासाच्या पदार्थामध्ये या मिठाचा वापर करतात. पण रोजच्या जेवणात जर या मिठाचा वापर केला तर ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.सैंधव मीठामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम यासह अनेक पौष्टिक पदार्थ असतात. म्हणून हे मीठ खाणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.चला तर मग जाणून घेऊयात याचे आणखीन कोणते फायदे आहेत.
१.सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे मृत त्वचा निघून जाते. तसेच त्वचा तजेलदारदेखील दिसते.
२.वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सैंधव मिठाचा उपयोग होऊ शकतो.आपले वजन वाढले असेल तर आपण आहारात सैंधव मीठाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
३.सैंधव मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने सैंधव मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने टॉन्सिल्सवर आराम मिळतो.
४. पचनसंस्थेच्या सर्व विकारांवर सैंधव मीठ उपयुक्त ठरते. लिंबू पाण्यात हे मीठ घालून प्यायल्यास पोटाचे विकार कमी होऊ शकतात.
५ .दातांचा पिवळटपणा दूर करण्यासाठी या मिठाचा उपयोग होतो. गरम पाण्यात सैंधव मीठ घालून पाणी प्यायल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
६. सैंधव मीठ हे वात,पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी आहे.
(टीप : कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
Trending
- Shivaji University Kolhapur : मास कम्युनिकेशन अन् जर्नालिझम विभाग झाले वेगळे
- माऊलींच्या अश्वांचे अंकलीहून अलंकापुरीकडे प्रस्थान
- मुंबईतून गावी आला आणि त्याने आपलं जीवन संपवलं !
- नवे दानवाडमध्ये हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 12 बकऱ्या ठार
- अखंड भारताच्या नवीन संसदेतील भित्तीचित्रावरून नेपाळमध्ये नाराजी
- खेड शिवापूर टोलनाका अन् लोणावळ्याजवळ 5 कोटींचे ड्रग्ज जप्त
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला, कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
- चालत्या ट्रेनवर दगडफेक;एकजण जखमी