वार्ताहर/कानूर
पिळणी, भोगोली, कानडी येथील कोल्हापूर टाईप बंधारे पाण्याखाली गेलेले शनिवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरून वाहतुकीतील व्यत्यय दूर झाला आहे.
गेल्या 24 तासात फाटकवडी मध्यम प्रकल्पाच्या खोऱ्यात 196 मिली मीटर पाऊस पडला असून आज अखेर 1647 मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दुपारपासून मुसळधार पावसाने जोर धरला होता शनिवारी सायंकाळी पिळणी आणि भोगोली हे बंधारे पाण्याखाली गेले होते तर रविवारी सकाळी घटप्रभा नदीवरील हिंडगावा पूल व कानडी बंधारा पाण्याखाली गेला होता. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची वाहतूक बंद केली होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पिळणी, भोगोली बंधाऱ्यावरचे पाणी उतरले असून हिंडगाव फुलावरील पाणीही ओसरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
हे ही वाचा : चिपळुणात पूरबाधित क्षेत्रात राहतात 1105 कुटुंबे!