कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर गगनबावडा रोडवर भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे या रोडवरील रहदारी खोळंबली आहे. ही दरड गगनबावड्याच्या अलीकडे 5 किलोमीटरवर कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे.
खारेपाटण-गगनबावडा रस्त्यावर कोसळलेली दरड काढण्यासाठी जेसीबी मागवण्यात आला असून,तो थोड्याच वेळात पोहोचल्यावर वाहतूक सुरळईत होईल असे सामाजिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.