तरूण भारत व मी ऊर्जिता आयोजित ख्रिसमस सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
कोल्हापूर प्रतिनिधी
नाताळच्या काळात ‘तरूण भारत’ आणि ‘मी ऊर्जिता’ने ख्रिसमस देखावा सजावट स्पर्धा घेतली. राज्यातील ही पहिलीच स्पर्धा घेऊन ख्रिस्ती बांधवांना मी ऊर्जिताने नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे ख्रिसमसचा वेगळा दृष्टीकोन जगभर पोहोचला आहे. भविष्यात मी ऊर्जिताच्या या उपक्रमाला अधिक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चचे पाळक, फादर अशोक गायकवाड यांनी व्यक्त केला.

‘तरूण भारत’ सोशल मिडीया आणि ‘मी ऊर्जिता’ यांनी नाताळमध्ये ख्रिसमस देखावा सजावट स्पर्धा घेतली. जिल्हय़ात या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ‘तरूण भारत’च्या दसरा चौक येथील कार्यालयात गुरूवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवासी संपादक मनोज साळुंखे होते. यावेळी प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायकवाड म्हणाले, ‘मी ऊर्जिता’ने सजावट स्पर्धेच्या माध्यमातून ख्रिस्त जन्माकडे वेगळय़ा दृष्टीकोनातून पाहिले. राज्यात त्यासाठी प्रथमच स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कोरोना काळात प्रत्येकजण सुखदुःखात एकत्र होता, प्रभू येशुच्या शेजाऱयांना मदत