बीडमध्ये धरणात बुडालेल्या डॉक्टरला बाहेर काढताना कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान बुडाला. राजू मोरे असे जवानाचे नाव आहे. आज माजलगाव येथे ही घटना घडाली. धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा काल मृत्यू झाला आहे. आज मदतीसाठी आलेल्या एनडीआरएफच्या मोरे यांच्यासोबत दुर्दैवी घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये काल डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे पोहायला गेले असता ते पाण्यात बुडाले. २४ तास उलटूनही त्यांचा मृतदेह हाती लागला नाही. डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टीमने शोधकार्य सुरू केले. यावेळी मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात बचाव पथकातील राजू मोरे आणि शुभम काटकर हे दोघे अडकले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आला. यात मोरे यांचा मृत्यू झाला. तर शुभमला वाचवण्यात यश आले असून त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Trending
- ऑगस्टपर्यंत नाट्यगृहांची कामे पूर्ण करावीत; चंद्रकांत पाटील यांचे आदेश
- Breaking News : महाराष्ट्रात दहावीचा निकाल 93.83 टक्के ; बारावीप्रमाणं दहावीतही मुलींचीच बाजी
- दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणाचीच बाजी !
- कोल्हापूरात 4 ते 6 पर्यंत उपसा बंदी
- मान्सून तोंडावर… शेतकरी बांधावर
- पेटणारा कचरा पाप कुणाचं…?
- …तर चौकशी समिती नेमली कशाला?
- ठेकेदारांच्या समस्या तातडीने दूर करणार