सुमारे 100 कुस्त्यां रंगणार : श्री महालक्ष्मी (अंबाबाई) यात्रेनिमित्त आयोजन
कळंबा/प्रतिनिधी
येथील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने शुक्रवार 27 मे रोजी दुपारी चार वाजता कळंबा मराठी शाळे नजीक पटांगणावरती निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे यात्रेनिमित्त सुमारे 100 कुस्त्या रंगणार असून जिल्ह्यातील विविध भागातून तसेच स्थानिक पातळीवरील मल्लांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. कोरूना च्या पार्श्वभूमीवर तीन वर्षानंतर होत असलेल्या या कुस्ती मैदानाकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.
पहिल्या क्रमांकाचे कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विक्रम शेटे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान उदयराज पाटील यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सनिकेत राऊत विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अमित कारंडे, तर तिसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान प्रवीण पाटील विरुद्ध गंगावेस तालमीचा पैलवान इंद्रजीत मोळे तिसऱ्या क्रमांकाची शाहूपुरी चा पैलवान अमोल बागव विरुद्ध मोतीबाग तालमीचा पैलवान कृष्णा कांबळे चौथ्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान भगत खोत विरुद्ध वारणेचा पैलवान रामा माने पाचव्या क्रमांकाची मोतीबाग तालमीचा पैलवान किरण पाटील विरुद्ध कुंभीचा पैलवान किरण मोरे सहाव्या क्रमांकाची क्रमांकाची (एन आय एस) आखाड्याचा पैलवान हृदयनाथ पाचाकटे विरुद्ध कापशी चा पैलवान चिलेश कदम यांच्यात होणार आहे.