वारणानगर / प्रतिनिधी
मुलगा झोपेतून उठत नसल्याचा राग मनात धरून पारगाव पानंद रोड जवळ एका विहिरीमध्ये आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सारिका संपत यादव (वय ३५, रा. बिरदेव वसाहत जुने पारगाव, ता. हातकणंगले ) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे . या बाबतची फिर्याद तानाजी जाधव याने कोडोली पोलिसात दिली.
या बाबत पोलीसांकडू मिळालेली माहिती अशी, सारिका ही तापट स्वभावाची होती. आज तीचा चौदा वर्षाचा मुलगा याला उठवण्यास गेली असता तो न उठल्याने रागाच्या भरात विहिरीत जाऊन उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे पती, एक मुलगा आणि सासू, सासरे असा परिवार आहे. कोडोली येथील आयटेक रेस्क्यू फोर्स च्या डॉ. प्रदीप पाटील, विलास आरळेकर, राजू वडार यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चिले विश्वास, व पोलीस नाईक नामदेव सुतार, भैरू माने, अभिजित पाटील हे करत आहेत.