Radhanagari 4th Gate Open : कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले त्यामुळे कोल्हापूरकरांना महापूराची धास्ती वाटू लागली आहे. आज दुपारनंतर तीन आणि चार नंबर चा दरवाजा उघडल्यानंतर भोगावती नदी पात्रात 7 हजार 312 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असे आवाहन पाठ बंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज पहाटे 5.30 वाजता राधानगरीचा एक दरवाजा उघडला. त्यानंतर थोड्या-थोड्य़ा अंतराने दरवाजे उघडायला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून तीन दरवाजे उघडले असून आता चौथा स्वयंचलित दरवाजा देखील उघडला आहे. धरणातून 7 हजार 312 क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या 3,4, 5 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले आहेत.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधी उघडले
सकाळी 5.30 वाजता राधानगरी धरणाचा स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडला.
त्यानंतर 8:55 वाजता गेट नंबर 5 उघडले.
दुपारी 2.30 मिनिटांनी तिसरा दरवाजा उघडला.
तर दुपारी 3.20 मिनिटांनी चार नंबरचा दरवाजा उघडला आहे.
सध्या 3,4, 5 आणि 6 नंबरचे दरवाजे उघडले आहेत.
धरणातून 7 हजार 312 क्यूसेकचा विसर्ग सुरु
Related Posts
Add A Comment