विटा(सांगली): क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापाठाच्यावतीने दिला जाणारा ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ वृंदाताई करात (Vrindatai Karat)यांना देण्यात येणार आहे. सहा ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अद्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतीसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाचे संघटक अॅड. सुभाष पाटील यांनी दिली.(Kranti Singh Nana Patil Award 2022 announced to Vrindatai Karat)
याबाबत अॅड. पाटील यांनी दिलेली माहिती अशी, कॉम्रेड वृंदा करात या पश्चिम बंगालमधील असून विद्यार्थी दशेपासून एसएफआय संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांवर संघर्ष करत आल्या आहेत.
वृंदाताई करात यांचा परिचय
लंडन येथील एअर इंडीयाच्या हवाई सुंदरीच्या यूनिफार्मसाठी प्रशासनाविरुद्ध त्यानी संघर्ष करून आपले म्हणणे मान्य करून घेतले. दिल्लीमधील कापड गिरणी मजुरामध्ये आलू सिटू या कामगार संघटनेच्या माध्यमातून काम केले. २००५ मध्ये पश्चिम बंगालमधून त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने राज्य सभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. एक अत्यंत जागरूक आणि लढावू खासदार म्हणून त्यानी प्रभावी काम केले आहे. त्याचवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरो या सर्वोच्च बॉडीमधे त्यांची निवड झाली.
हेही वाचा- मुंबईसाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु करा; नागरीकांची मागणी
दिल्लीमध्ये सरकार पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीरपणे सामान्य लोकांच्या राहत्या घरावर बुल्डोजर फिरवायला लागलें, दिल्लीतील इतर विरोधी पक्ष गप्प राहून तमाशा पाहत होते. त्यावेळी वृंदाताई सर्वोच्च न्यायालयाची मनाई घेऊन सरकारच्या बुल्डोजरच्या विरोधात भक्कम भिंत बनून उभ्या राहिल्या. सामान्य माणसाला दिलासा दिला. सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची बांधीलकी आणि योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, आणि २१ हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असेही अॅड. पाटील यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा- SANGLI; जाडरबोबलाद येथे वाहन चालकाचा ठेचून खून, खुनाचे कारण अस्पष्ट
याआधी मिळालेल्या पुरस्कार विजेत्यांची यादी
या आगोदर आचार्य गरूड, नागनाथअण्णा, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, आमदार भाई गणपतरावजी देशमुख, साथी मृणालताई गोरे, मेघाताई पाटकर, विकासभाऊ आमटे, प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. अभय बंग, पर्कार पी साईनाथ, अशोक ढवळे, सीताराम येचुरी, डॉ. गणेश देवी, कानगोंना पुरस्कार दिला आहे.
Previous ArticleSatara Political:अभिनेते तेजपाल वाघ यांना लागलेत राजकीय डोहाळे
Next Article ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर इचलकरंजीत आता खो-खो खेळही
Related Posts
Add A Comment