प्रयागराज : सध्या भारतभर गाजत असणारे कृष्णजन्मभूमी प्रकरण आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत:कडे वर्ग करुन घेतले आहे. सध्या या संबंधातील काही प्रकरणे मथुरा येथील कनिष्ठ न्यायालयात चालत आहे. आता ती सर्व एकत्र करुन उच्च न्यायालयाने स्वत:कडे हस्तांतरीत केली आहेत. या हस्तांतरणाची मागणी हिंदू पक्षकारांनी केली होती. हिंदू पक्षकारांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या स्थानी असणारी मशिद ही तेथे असणारे पूर्वीचे हिंदू मंदीर पाडून बांधण्यात आली आहे, असे प्रतिपादन हिंदू पक्षकारांच्या वतीने करण्यात आले. या स्थानाचे सर्वंकष सर्वेक्षण करण्यात आल्यास याचे पुरावे सापडतील, असेही हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे.
Previous Articleभारतातील पेयजलाचे वाढते दुर्भिक्ष्य
Next Article यंदा जूनमध्ये मान्सून कमीच
Related Posts
Add A Comment