Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या चौकातच आज कोल्हापूर कृती समितीच्या एका पदाधिकाऱ्याला दोन ते तीन कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. महापालिकेच्या वरच्या मजल्यावरून कृती समितीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करत भर चौकात त्याला शिवीगाळ केली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मारहाण झालेली व्यक्ती हा कोल्हापूर कृती समितीतील पदाधिकारी आहे. तर मारहाण करणारा व्यक्ती हा एका शाळेत शिक्षक असल्याचे सांगितले जाते. त्याच्या सांगण्यावरूनच तीन ते चार कार्यकर्त्यांनी येऊन कृती समितीच्या पदाधिकाराला मारहाण केली आहे. ही घटना दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संबंधित एका प्रकरणाची माहिती अधिकारातून घेत असल्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असल्याचे समजले आहे. मात्र याबाबत गुन्हा नोंद झालेला नाही.
Trending
- भारत-ऑस्ट्रेलिया ‘डब्ल्यूटीसी फायनल’ आजपासून
- राष्ट्रपती मुर्मू यांना सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- युद्धात युव्रेनमधील सर्वात मोठे धरण नष्ट
- मणिपूरमध्ये शोधमोहिमेदरम्यान गोळीबार, जवान हुतात्मा
- सेन्सेक्स- निफ्टीमध्ये तेजीची झुळूक
- भाडेकरूंनाही मिळणार ‘गृहज्योती’चा लाभ
- माझगाव डॉक समभागाची दमदार वाटचाल
- 6 पाणबुड्यांच्या निर्मितीच्या करारासमीप भारत अन् जर्मनी