वाकरे।प्रतिनिधी
कुडीत्रे ता. करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस बहुउद्धशीय हॉल कसबा बावडा येथे सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला.
पहिल्या फेरीत मतदान केंद्र क्रमांक 1 ते 35 येथील मतपत्रिकांचे सॉटिंग सुरू झाले सकाळी 9.45 पर्यंत हे काम सुरू होते. २५ मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आले असून, सर्व गटांची मतमोजणी एकाच वेळी होणार आहे. साधारणपणे 10 वाजता सर्व गटातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीस प्रारंभ होऊन पहिल्या फेरीतील निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सावरवाडी पॅनेल टू पॅनेल प्रमाणे नरके पॅनेल 205 पैकी 63, राजर्षी शाहू पॅनेल 205 पैकी 100 समिश्र मोजणी सुरू झाली आहे.
Previous Articleआंतर विभाग शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
Next Article अर्जुन स्पोर्ट्स ,युनिव्हर्सल स्पोर्ट्स विजयी
Related Posts
Add A Comment