या दिवसात मिळणाऱया सगळय़ाच वेलवर्गीय भाज्या, तसेच गाजर, मुळा, मटार आणि फ्लॉवर, कोबी आमच्या रसनेचे चोचले पुरवतात. भाज्यासुद्धा लेकुरवाळय़ा होतात. कोण कुणाच्याकडे खांद्यावर वाढेल, कोण कोणत्या वेलींना लोंबकळत बाहेर डोकावेल हे सांगता येत नाही. अशा या सगळय़ा भाज्यांची लेकुरवाळी भाजी किंवा उंदीयो आम्हाला आनंद देऊन जातो. हेमंत ऋतूच्या हलक्मया थंडीचे पाऊल न वाजवता आलेला शिशीर, सूर्याचं दक्षिणायन संपायला आल्याची वर्दी घेऊन येतो. अशा या सूर्याला आपल्या मनात, घरादारात आपण कायमच साठवून ठेवलेय असं सांगण्यासाठी आम्हीसुद्धा दारात चुली मांडून शेतात आलेले नवीन तांदूळ पोंगलच्या रुपात तिथे शिजवायला ठेवतो, लोहोडीच्या रुपात त्याच्याभोवती फेर धरतो, तर तीळ गुळाच्या रूपात आम्ही या सूर्याला पोटात साठवून ठेवतो. म्हणूनच या सगळय़ा काळाला पर्वकाळ असं म्हटलं जातं. उत्तरायणात तो पुन्हा नव्याने येणारच असतो आणि किरणांमधलं अमृततत्त्व आम्हाला चाखायला मिळणार असतं. एरवी उकाडय़ामुळे नकोसा वाटणारा सूर्य आता अंगा खांद्यावर मिरवावासा वाटतो. शालीमध्ये भरून घ्यावासा वाटतो आणि मुठीमध्ये लपवावासा वाटतो. नाताळात येणारा सांता जणू देवदूत असतो, तसेच या पंचमहाभूतांचे देवदूतसुद्धा आमच्या अवतीभोवती सतत रुंजी घालत असतात. वाऱयांमधून वाहणारे चैतन्य जसं आमच्या अंगाला स्पर्शून जातं तसं ते कानांनाही कधी कधी ऐकायला येतात. फुलांच्या सुगंधातून आपल्या श्वासामधून तो विरघळत असतो. आणि साऱया पृथ्वीला चंदनाचे कस्तुरीचे परिमल बहाल करून जातो. या हंगामात दवबिंदू जेव्हा झाडावर उतरतात तेंव्हा झाडांवर उरलेली पानं ह्या दवबिंदूंना अलगद आपल्या तळहातावर झेलतात. आणि सूर्याला अर्घ्य द्यायला सज्ज होतात. म्हणूनच की काय या ऋतूला सौंदर्यवतींचा ऋतू म्हटले जाते. दवबिंदू मोत्यांचे सर फांद्यांना घालून त्या वाळक्मया फांद्यांचे सौंदर्य वाढवतात. त्यातून सूर्याची किरणे डोकवायला लागली तर हे सगळे दवबिंदू लोलकासारखे दिसतात. निरभ्र आकाशात धुक्मयाची पांढरी शुभ्र दुलई काढून सगळय़ा चराचराला जणू पांघरून घालत आहे असे वाटते. सगळीकडे पांढरे शुभ्र मऊ मखमली पडदे सोडलेत असा भास होतो. मायेची उब देणारे हे धुक्मयाचे पडदे पाहिले की लक्षात येते, ही नवलाई पाहायला आकाशामध्ये केशरी आणि पिवळय़ा रंगाची वस्त्र लेवून एखादा विरक्त संन्यासी निघावा तसाच सूर्यसुद्धा निघालाय. आता मात्र धुक्मयाला पांघरूणाच्या घडय़ा आवरून ठेवायला लागतात. कारण पुढच्या ऋतूला पायघडय़ा घालण्याची सूचना मिळालेली असते.
Previous Articleमध्यप्रदेश, हरियाना अंतिम फेरीत
Next Article 2023 मध्ये होणार 5 मोठे बदल
Related Posts
Add A Comment