आमदार शशिकांत शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी/ सातारा
सध्याच्या सरकार व त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत. विकास निधीपासून विरोधकांचा आवाज दाबण्यापर्यंतचे काम सुरु आहे. अधिकाऱयांनी निपक्षपणे काम केले पाहिजे. परंतु सध्याचे अधिकारी हे एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहेत. वारंवार सांगून सुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसल्याने गुरुवार दि. 23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. दरम्यान, त्यांनी सध्या जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रचंड सहानभूती आहे, असेही सांगितले.
राष्ट्रवादी भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, जिह्याला एक परंपरा आहे. परंतु ही परंपरा मोडण्याचे काम सध्याचे अधिकारी करत आहेत. यापूर्वीचे जिल्हाधिकारी होते. ते निपक्षपातीपणे काम करायचे, परंतु आताचे अधिकारी हे निपक्षपणे वागण्यापेक्षा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. मी अनेकदा सांगूनही बदल झाला नाही. त्यामुळे दि. 23 रोजी जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्यात मी झालेला बदल जाहीर करणार आहे, असे सांगत पुढे ते म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या भंगाराबाबत विधी मंडळात आश्वासन दिले होते. कार्यवाही करण्याचे आदेश देवूनही केस कोणी टाकायची यावरुन आता थांबले आहे. वेळकाढूपणाचे काम सुरु आहे. ज्यांची नावे येणार आहेत. त्यांच्या घरी काही मंडळी जेवण करायला गेली आहेत. म्हणजे एकाला एक आणि एकाला एक न्याय असा प्रकार सुरु आहे. प्रशासनाया माध्यमातून काम करताना विरोधी लोकांवर दबाव आणला जात आहे. खोटय़ा केसेस केल्या जात आहेत. त्यासाठी आता न्याय मिळवाया असेल तर आंदोलना शिवाय पर्याय नाही. म्हणून दि. 23 रोजी लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच शेतकऱयांची वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसुचना न देता तोडली जात आहेत. डीपी फार मोठी कमतरता आहे, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या संदर्भात लाठी मोर्चा बॉम्बे रेस्टाँरट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात येईल, असे सांगत त्यांनी अधिकाऱयांच्याही तक्रारी आहेत. वेळ आल्यावर त्याही उघड करेन, असेही त्यांनी जाहीर केले.
मी कोरेगावमधील एकाधिकारशाही मोडीत काढणार
मी आहे येथेच आहे. मी कोठेही जाणार नाही. माझी विरोधकांनी धास्ती घेतल्याने ते आता माझ्याबाबत चर्चा करु लागलेत. माझाच प्रचार ते करतील अशी चर्चा करत असल्याने ते राष्ट्रवादीत येतील काय हे सांगता येत नाही. मला कोरेगावातील एकाधिकार शाही मोडित काढायची आहे, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंना मिळतेय सहानभूती
सर्वसामान्य शिवसैनिकांना आता ज्या घडमोडी घडलेल्या आहेत. त्या पटलेल्या नाहीत. मला एका सर्वसामान्य शिवसैनिकांचा फोन आला साहेब काहीही करा कोर्टात जा पण हे थांबवा अशी विनंवणी करत होता. आताचे जे राजकारण सुरु आहे ते दबावाचे आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी जो निर्णय दिला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठी सहानभूमी मिळते आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याने तर त्यात आणखी भर पडली आहे, असे परखड मत व्यक्त करत आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, 2024 च्या विधानसभा, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे, असे सांगितले.
अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करायचं ठरले होते
ऑफ दि रेकॉर्ड बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा बनले. तेव्हा सगळय़ांना एकत्र आणण्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पुढाकार होता. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच करायचे होते. तशी त्यावेळी चर्चा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये ज्येष्ठ दिग्गज, राष्ट्रवादीमध्ये एकसो एक दिग्गज. त्यामुळे या सर्वांना एकत्र आणण्यासाठी वचक असावा म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. नाहीतर महाविकास आघाडी ही सहा महिने सुद्धा टिकली नसती, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी चित्रीकरण आणि रेकॉर्डिंग बंद करायला लावून बोलले.