Laxman Hake : शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. तीन दिवसांपूर्वी आंबेडकरवादी नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणारे लक्ष्मण हाके शिवबंधन बांधणार आहेत. यामुळे शिवसेनेला एक आक्रमक ओबीसी आणि धनगर चेहरा मिळणार आहे. (Laxman Hake latest news)
आज विनायक राऊत यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते मातोश्रीवर येऊन ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून हाके यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, मारहाण करण्यापेक्षा…
लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमए चं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके विरुद्ध शहाजीबापू पाटील अशी सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Previous ArticleKolhapur; पावसाने ओढ दिल्याने कसबा बीड भागातील शेतकरी चिंतेत
Related Posts
Add A Comment