तेलंगणा सीरियल किलर प्रकरण
हैदराबाद / वृत्तसंस्था
तेलंगणामधील बहुचर्चित सीरियल किलर प्रकरणात 17 महिलांची हत्या करणाऱया आरोपीला न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणात शिक्षा जाहीर केली. जोगुलंबा-गडवाल न्यायालयाने या सीरियल किलरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. येरुकली श्रीनू (वय 47) असे आरोपीचे नाव आहे. येरुकली याला एका महिलेच्या खुनाच्या गुन्हय़ात ही शिक्षा झाली आहे. तिसऱया अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱयांनी त्याला दोषी ठरवून चिट्टी अलिवेलम्मा या महिलेच्या हत्येप्रकरणी जन्मठेप सुनावली.
17 डिसेंबर 2019 रोजी मेहबूबनगर जिह्यातील एका गावाजवळ अलिवेलम्माचा मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी सीरियल किलर येरुकलीला पोलिसांनी 2019 मध्ये अटक केली होती. एका दशकात त्याने अन्य 16 महिलांची हत्या केल्याचे तपासात समोर आले होते. येरुकलीच्या पत्नीलाही एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. येरुकलीने आपल्या भावाचीही हत्या केली होती. 2009 मध्ये त्याला भावाच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु, तुरुंगातील चांगल्या वर्तनासाठी 2013 मध्ये त्याची सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आणखी चार खून केल्याचे अन्य खुनांच्या चौकशीदरम्यान स्पष्ट झाले होते.