बेळगाव : एमटूएच ईव्हेंट्स प्रस्तुत माणिक विंग्जतर्फे आनंद यात्रीच्या सहकार्याने दि. 29 रोजी दर्शन रावळ व सीयाना कॅथरीन यांची लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. जिल्हा क्रीडांगणावर कार्यक्रम आहे. दु. 3.30 वा. गट्स खुले होतील. देणगी प्रवेशिकासाठी 6364927737 व 6364927736 या क्रमांकावर संपर्क साधावा.
दर्शन रावळ
हे गायक, संगीतकार, अभिनेते व गीतकार आहेत. हिंदी, गुजराती, तेलगू भाषेत ते गातात. स्टारप्लस म्युझिकच्या रिआलिटी शोचे ते पहिले रनरअप आहेत. गुजराती पडद्यावरील कामगिरीसाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट मेल सिंगर म्हणून ते सन्मानित आहेत.
सीयाना कॅथरीन
सीयाना या डी. जे. गायिका असून बेलीडान्स ते हीपहॉप नृत्य प्रकार त्यांना अवगत आहे. पॉवर मिक्स नावाने त्या पॉडकॉस्ट चालवितात. ज्याचे प्रक्षेपण 18 देशांमध्ये होते. भारतासह अनेक देशात त्यांच्या कॉन्सर्ट झाल्या आहेत.