सदरचे कर्ज हे बँक किंवा बिगर बँकिंग आर्थिक संस्थांकडून मिळणार असल्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर आपल्याकडे जीवन विमा पॉलिसी (लाईफ इन्शुरन्स पॉलिसी) असल्यास संबंधीत पॉलिसीधारकांना आता कर्ज घेण्याची सुविधा मिळणार आहे. पॉलिसीनंतर सोप्या पद्धतीने कमी व्याजदरावर कर्ज घेता येणार आहे. सदरचे कर्ज हे बँक किंवा बिगर बँकिंग आर्थिक संस्थांकडून घेता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
काय असेल सरेंडर व्हॅल्यू ?
लाईफ इन्शुरन्सबाबत पूर्ण कालावधीपर्यंत चालण्याअगोदर पॉलिसी सरेंडर करण्यामध्ये ग्राहकांना प्रीमियमच्या आधारे देण्यात आलेल्या रक्कमेचा काही भाग परत मिळू शकतो. ज्यामध्ये शुल्क वजा करुन यातील सरेंडर व्हॅल्यू निश्चित करण्यात येते.
सर्व पॉलसींवर सरेंडर व्हॅल्यू मिळते?
फक्त त्या पॉलिसीमध्येच सरेंडर व्हॅल्यू परत होत नाही ज्यामध्ये विम्यासोबत गुंतवणुकीचा हिस्सा राहतो. निव्वळ टर्म प्लॅनमध्ये कोणीही सरेंडर व्हॅल्यू नाही राहत. तसेच एडोमेंट, मनीबॅक आणि युलिप यासारख्या पारंपारिक प्लॅनमध्ये सरेंडर व्हॅल्यू राहते. या व्यतिरिक्त संबंधीत पॉलिसीधारकांना दोन वर्षांमध्ये सलगपणे प्रीमियम पेमेंट केले असेल तर काही कंपन्यांमध्ये याची मर्यादा ही 3 वर्षांपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे.
काय असेल व्याज?
व्याजदर प्रीमियम रक्कम आणि पेमेन्ट करण्यात आलेली प्रीमियमची संख्या यावर ही बाब निश्चित होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर कर्ज घ्यायचे झाल्यास त्यासाठी अर्ज देण्यासोबत जीवन विमा पॉलिसीची सर्व आवश्यक ओरिजनल कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत.