पुणे / प्रतिनिधी :
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि‘च्या पुणे विभागीय कार्यालयाचा सातवा वर्धापनदिन रविवारी (05 मार्च 23) उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने सेनापती बापट रोडवरील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आयकॉनिक इमारत असलेल्या ‘लोकमान्य सोसायटी‘च्या पुणे विभागीय कार्यालयात संपूर्ण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सर्व ग्राहक- सभासद, हितचिंतक व मान्यवर पुणेकरांनी प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊ शुभेच्छा दिल्या.
लोकमान्य सोसायटीतर्फे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर व विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले व शुभेच्छांचा स्वीकार केला. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पुणेकरांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रसारमाध्यम, वैद्यकीय, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
‘लोकमान्य सोसायटी‘ व पुणेकरांमध्ये एक वेगळाच ऋणानुबंध निर्माण झाला आहे. आपल्या पारदर्शक व्यवहाराच्या बळावर वित्तीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात देखील ‘लोकमान्य सोसायटी‘ने पुणे महानगरसह संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचाच एक परिपाक म्हणून वर्धापनदिनी शुभेच्छांचा ओघ वाढतोच आहे, अशी प्रतिक्रिया ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी या निमित्ताने दिली.