बेळगाव ; लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने महिला दिनाचे औचित्य साधून नारी सन्मान ठेव योजना सुरू केली आहे. नव्या युगात स्त्री ही केवळ गृहिणी नाही, तर ती निर्णय घेणारी, कर्तृत्ववान आणि पुऊषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी नेहमीच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या 55 टक्के कर्मचारी या महिला आहेत आणि त्यापैकी अनेक त्यांच्या विभागाचे व शाखांचे नेतृत्व करतात. 213 शाखांचा विस्तार असणारी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. लोकमान्य नारी सन्मान ठेव योजना ही केवळ महिला ठेवीदारांसाठी (लहान मुलींसाठी सुद्धा) उपलब्ध आहे. ठेवीदाराला 9.60 टक्के आकर्षक व्याज मिळेल. ठेवीची मुदत 18 महिने आहे. किमान गुंतवणूक दहा हजार रुपये किंवा त्यापुढे हजाराच्या पटीत असेल. सभासद महिला जास्तीतजास्त कितीही रक्कम गुंतवू शकतील. ज्येष्ठ नागरिक महिला अतिरिक्त 0.50 टक्के व्याजासाठी पात्र आहेत. काही अटी व शर्तींवर ठेवी आणि मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. 10 लाखांहून अधिक एकरकमी ठेव पावतीवर सुद्धा अधिक व्याज दर मिळणार आहे. लोकमान्य नारी सन्मान ठेव योजना मर्यादित काळासाठी असून 31 मे 2023 पर्यंत कार्यान्वित राहील. अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री नंबरवर 18002124050 वर कॉल करा.
लोकमान्य सोसायटीचे रक्तदान शिबिर 28 रोजी
‘लोकमान्य’ मल्टिपर्पज कॉ-ऑप सोसायटीच्या, लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकमान्य सोसायटीतर्फे दि. 27 रोजी रक्तदान शिबिर होणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यामुळे ते आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत केएलई सोसायटीच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने लोकमान्य रंग मंदिर कोनवाळ गल्ली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.