पावसामुळे कचरा साळ नदीत जाण्याची भीती
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेची मान्सूनपूर्व कामे लांबणीवर पडत चालली आहेत. पालिकेने 16 लाख रुपये खर्चाची ही मान्सनपूर्व क?ामे करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस पडत असल्याने नाले, गट?ारांतील प्लास्टिक व अन्य कचरा साळ नदीत वाहून जाऊन नदी प्रदूषित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
म?ान्सूनपूर्व कामांसाठी मजुरांचा पुरवठा करण्यासाठी निवडलेल्या दोन कंत्राटदारांपैकी एकाने नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यास नकार दिला आहे, तर दुसऱया ठेकेदाराने नियोजित वेळेनुसार काम सुरू केले आहे. परंतु यंदा नाले सफाईचे उद्दिष्ट पालिका साध्य करू शकेल का, असा प्रश्न पालिका आवारात उपस्थित केला जात आहे. एकंदर परिस्थिती पाहता, नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी निविदा मिळालेले कंत्राटदार आणि नगरसेवकांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन चर्चा केली आहे. एकाने माघार घेण्याची धमकी दिल्याने नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. मजुरांचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचे काम मोठय़ा धूमधडाक्मयात केले गेले, मात्र निविदा काढण्याचा निर्णय विलंबाने घेतल्याने पालिकेवर आता टीका होत आहे.
पावसाच्या तडाख्यात नगरसेवक कक्षाची हानी
अवकाळी पावसाच्या तडाख्यात मडगाव पालिका इमारतीमधील नगरसेवकांसाठी असलेल्या कक्षातील रूफ फ्लोअरिंगच्या काही शिट्स खाली पडल्या. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने कोणलाही दुखापत झाली नाही. दरम्यान, पालिकेच्या इमारतीची आवश्यक डागडुजी व रंगरंगोटी करण्याची तसेच व्हरांडय़ात पडून असलेले टाकावू साहित्य हटविण्याची गरज नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी व्यक्त केली आहे.