ओटवणे / प्रतिनिधी–
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माडखोल येथील व्हि पी फार्मसी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या ध्वजारोहणाचा मान माडखोल गावातील जेष्ठ माजी सैनिक जनार्दन सावंत यांना देण्यात आला. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्यावतीने माडखोल गावातील माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजी सैनिकांचा संस्थेचे प्रशासकिय अधिकारी पंकज पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी माडखोल माजी सैनिक संघटना अध्यक्ष मसाजी राऊळ, माजी अध्यक्ष पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव सहदेव राऊळ, उमेश कारीवडेकर, सदस्य न्हानु राऊळ, चंद्रकात शिरसाट, ऊमेश पुंडलिक राऊळ, नारायण शंकर राऊळ, जनार्दन सावंत, कमलाकर परब, दिपक परब, नारायण गोविंद राऊळ, सुरेश नार्वेकर आदी माजी सैनिक उपस्थित होते.
.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या ध्वजारोहणाचा मान माजी सैनिकास देऊन माडखोल गावातील माजी सैनिकांचा सन्मान केल्याबद्दल माडखोल माजी सैनिक संघटनेने महाविद्यालयाचे आभार मानले.