ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने धनवी रामनगर नालासोपारा (पू) येथील एका चाळीवर छापा टाकला. या कारवाईत एटीएसने माओवाद्याला ताब्यात घेतलं आहे. हा माओवादी झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय च्या प्रादेशिक समिती सदस्य आहे. कारु हुलास यादव असं ताब्यात घेतलेल्या माओवाद्यांचं नाव आहे. त्याच्या डोक्यावर १५ लाखांचे बक्षीस असून वैद्यकीय उपचारासाठी तो नालासोपाऱ्यात आला होता, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, कारु हुलास यादव हा झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १५ लाखांचं बक्षिस होतं. वैद्यकीय उपचारांसाठी तो मुंबईतील नालासोपाऱ्यात आला होता. याची एटीएस ला माहिती मिळाल्यांनतर नालासोपाऱ्यातील चाळीवर छापा टाकून कारु हुलास यादव याला ताब्यात घेतले.