कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी राज्यसभेत कर्नाटक सरकारवर निशाणा साधला. कर्नाटक सरकारला इशारा देताना त्यांनी महाराष्ट्रातून जाण्याशिवाय कर्नाटकला पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद (Maharashtr- Karnatak Border Dispute ) सध्या तापला असून त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात राज्यसभेत ( Rajyasabha ) आणि लोकसभेत ( Loksabha )उमटत आहेत. दोन्ही सदनाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा लक्षवेधी ठरणार आहे. राज्यसभेला बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ‘तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हांलाही देशभरात कुठेही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर तुमच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव ठेवा” असे बोलून त्यांनी कर्नाटकातील कन्नड वेदिकेच्य़ा आंदोलनकर्त्यांना दिला. तसेच खासदार महाडिकांनी केंद्र सराकरने हस्तक्षेप करून मार्ग काढवा अशी मागणी केली आहे.
Previous ArticleOrange Peel Tea Benefits : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा चहा गुणकारी
Next Article राज्यपालांविरोधात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक
Related Posts
Add A Comment