Maharashtra Monsoon Session 2022 : पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून अनेक मुद्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तर सत्ताधाऱ्यांनी देखील टिकेला उत्तर दिले. त्याचबरोबर विधानसभेत सादर केलेल्या प्रस्तावाला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन प्रस्तावासंदर्भात माहिती दिली. यामध्ये औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.याबरोबरचं नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे.
राज्यातील अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र गुन्ह्यात ११ व्या क्रमांकावर आहे. ठाण्यातील डान्सबारवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत माहिती घेण्यात आली आहे. लवकरच डान्सबारवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर अंमली पदार्थाबाबत जून 2022 पर्यंत 6622 गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
Trending
- दहिवडी पोलिसांकडून एका तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोघांकडून 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त
- शिवछत्रपतींनी कधीही भोसल्यांचं राज्य केलं नाही
- लग्नसोहळा असलेल्या घरातून दागिन्यांची चोरी
- पावसाची अद्याप दडीच
- दिल्ली पोलीस ॲक्शन मोडवर, ब्रिजभूषण सिंह यांच्या घरी 12 जणांची चौकशी
- साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्यावर काँग्रेसने केला घोटाळ्याचा आरोप
- विद्यालये गजबजली, मुले उकाड्याने हैराण!
- माझी वसुंधरा अभियानात ‘कराड’ राज्यात पहिले