गणपती पेठ येथे सायकलवरून पडल्याने खुबा दुखावलाः भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू
प्रतिनिधी/सांगली
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांचा बुधवारी सांयकाळी गणपती पेठ येथे अपघात झाला. या अपघातात त्यांचा खुबा दुखावला आहे. त्यांच्यावर आता भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलीसांनी दिली.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे नेहमीप्रमाणे सायकलवरून गणपती पेठेतून जात असताना अचानक त्यांची सायकल घसरली आणि ते खाली पडले.त्यामध्ये त्यांच्या खुब्याला मार लागला आहे. तात्काळ नागरिकांनी त्यांना सांगली शहर पोलीस ठाण्याच्याजवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. पण त्याठिकाणी त्यांच्या खुब्याला चांगलाच मार लागल्याचे समोर आल्यावर त्यांच्यावर अधिक चांगल्याप्रकारे उपचार करण्यासाठी तात्काळ भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीसांनी सांगितले. संभाजीराव भिडे हे नेहमी सायकलवरून ये-जा करत असतात. बुधवारीही ते सायकलवरून गणपती पेठेतून जात असतानाच अचानक ते सायकलवरून खाली कोसळले. त्यामध्ये त्यांच्या खुब्याला मार लागला आहे. ही माहिती शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर तात्काळ ते हॉस्पिटलमध्ये आले.