मुंबई : राज्यात दररोज महागाईचा आलेख चढतच आहे. काल गॅस दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. तर आज महावितरणाने इंधन समायोजन आकारात (FAC) वाढ केली आहे. यामुळे याचा फटका आता राज्यातील ग्राहकांना बसणार तर आहेचं शिवाय सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेट मात्र कोलमडणार आहे. (Electricity Rate Increase)
का झाली वाढ?
मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा FAC वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येते.जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा- खासदार धनंजय महाडिकांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
FAC कशी वाढ होते
युनिट आधी आता
0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
101 ते 300 युनिट आधी 20 पैसे आता 1 रुपये 45 पैसे
301 ते 500 युनिट आधी 25 पैसे आता 2 रुपये 05 पैसे
501 युनिटच्या वर आधी 25 पैसे आता 2 रुपये 35 पैसे
Previous Articleटंकलेखन परीक्षा उत्तीर्णतेसाठी दोन वर्षांची मुदतवाढ
Next Article GST विरोधात राज्यातील व्यापारी आक्रमक
Related Posts
Add A Comment