काँग्रेसने भाजपच्या दोन मतदारांवर आक्षेप घेतला आहे. या आक्षेपाला विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. काँग्रेसने असंवेदनशीलतेचा कळस गाठला, अशा शब्दात टीकास्त्र डागलं.आजारी असलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने घेतलेला आक्षेप दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.
अखेर मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात निकाल हाती येणार. राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, शिवसेनेकडून अरविंद सावंत हजर
विधान परिषदेचं मतदान सुरु असताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित दादांच्या भेटीला गेल्याने विधानभवनात चर्चेला उधान आले आहे. महेश बालदी यांच्या मतदारसंघातील कामासाठी भेट घेतल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. कुठलाही निरोप घेऊन अजित पवारांच्या भेटीला गेलो नव्हतो. यातुन दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. माझ्या मुलाच्या लग्नावेळी ते आले होते. त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी गेलो होतो. असेही ते म्हणाले.
राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपला विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर महाविकास आघाडीला फटका बसल्याने मविआ सावध झाली आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत दोन्ही पक्ष आपलाचं विजय होणार या मतावर ठाम होते. तसेच या निवडणूकीत देखील दोन्ही पक्षांनी विजयाची आधीच घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान भाजपाच्या ५० आमदारांनी मतदान आतापर्यंत मतदान केलं असून, आत्तापर्यंत ६८ जणांचं मतदान पूर्ण झालं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले. दुपारी १२ वाजेपर्यंतचे एकूण 203 मतदान झाले आहे.
काॅंग्रेसकडून भाजपच्या दोन मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. यामध्ये लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांचा समावेश आहे. दरम्यान निवडणूक घेऊनच मतदान केले आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे संजय कुटे यांनी दिली आहे. माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, आजारी आमदारांच्या प्रामाणिकतेवर संशय घेणे हे अयोग्य आहे. निवडणूक अधिकारी काॅंग्रेसचा आक्षेप फेटाळणार असल्याचे भाजपाने सांगितले आहे.
विधानपरिषदेसाठी केवळ १० आमदारांच मतदानं बाकी.
बविआची तीनही मतं काॅंग्रेसच्या पारड्यात?
मनसे आमदार लक्ष्मण जगताप विधानभवनात दाखल.
तब्येत बरी नसल्याने अॅम्ब्युलन्सने मुंबईत दाखल झाले आहेत.
भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान झालं.
राष्ट्रवादीच्या ४७ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे –
भाजपा – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना – आमश्या पाडवी, सचिन अहिर
राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
मते देणार नसाल तर सरकार धोक्यात येईल; कॉंग्रेसचा इशारा
.मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष कमळबळ मिळावे यासाठी बाण जरा बोथट होताहेत काय असा थेट प्रश्न कॉंग्रेसने केला आहे. तसेच शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरीत करण्याचा विचार नसेल तर आमचा उमेदवार पडू शकेल अन् महाराष्ट्रात मविआ सरकार धोक्यात येईल असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.
मनसेचे मत कुणाला?
विधानपरिषदेसाठी मनसेला गृहित धरु नका असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या भेटीला गेले आहेत.
Previous Articleपावसाळ्यात जोडीदारासोबत फिरायचा प्लॅन करताय…. तर मग नक्की वाचा
Next Article अग्निपथच्या विरोधातील आंदोलन कर्त्यांची धरपकड
Related Posts
Add A Comment