थंडीच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध होतात.आणि गाजराचा सीझन आला की प्रत्येकाच्या घरात हलवा बनवला जातो. हा हलवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो. शिवाय तो चविष्ट आणि पौष्टिकही असतो.पण हलवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. तसेच गाजर किसताना देखील त्रास होतो. पण आज आपण गाजर न किसता झटपट हलवा कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
साहित्य
अर्धा किलो गाजर
तीन चमचे तूप
एक चमचा वेलची पूड
पाव वाटी ड्रायफ्रुटस
साखर
२ चमचे खवा
दूध
कृती
सर्वप्रथम गाजराचे बारीक काप करून घ्या. यानंतर कुकरमध्ये ते काप घालून त्यात १ ग्लास दूध घालावे. आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. हे मिश्रण थंड झाल्यावर एका कढईमधे ३ चमचे तूप घ्यावे आणि त्यामध्ये आवडीनुसार ड्राय फ्रुटस तळून घ्यावेत.यांनतर त्यामध्ये थंड झालेले गाजराचे मिश्रण घालावे.मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात थोडेसे दूध घालावे. हे मिश्रण उकळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर घालावी. (आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता) तसेच त्यामध्ये वेलची पूड आणि २ चमचे खावा घालावा. आणि सर्व मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यावे.तयार झालेला झटपट आणि स्वादिष्ट हलवा फ्रिजमध्ये ठेवून किंवा थंड झाल्यावर तुम्ही सर्व्ह करू शकता.
Trending
- केआर शेट्टी, स्पोर्ट्स ऑन, मोहन मोरे विजयी
- बेळगाव स्पोर्ट्स क्लब, हुबळी क्रिकेट अकादमी संघ विजयी
- पाकला नमवत भारतीय युवकांनी जिंकला आशिया चषक
- एलिस मर्टेन्स, आर्यना साबालेन्का चौथ्या फेरीत
- रेल्वे अपघातात 50 ठार
- कायद्याला वाकुल्या दाखविणाऱ्या विधानसभा
- तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत उदासीनता का ?
- ‘रिझनेबल टाइम’मध्ये शिंदे सरकार गतिमान!