हिवाळ्यात बाजारामध्ये हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो.मटार मध्ये फायबर असल्यामुळे त्याचे आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत.सामान्यतः या वाटाण्यांचा वापर भाजीमध्ये किंवा भातामध्ये केला जातो. पण आज आपण हिरव्या वाटाण्यांपासून खमंग पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
साहित्य:
ताजे हिरवे वाटाणे: – २ वाट्या
आवश्यकतेनुसार पाणी
गव्हाचे पीठ: – २ वाट्या
बेसन पीठ – १/२ वाटी
तेल
मीठ
तूप – १ चमचा
ओवा – १/२ चमचा
कसुरी मेथी – १ चमचा
कलोंजी – १/२ चमचा
हळद – १ चमचा
धना जिरा पावडर – १ चमचा
३ हिरवी मिरच्या
जिरे,मोहरी: – १/२ चमचे
लाल तिखट: – १ चमचा
अमचूर पावडर: – १/4 चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
सर्वप्रथम एका परातीमध्ये २ वाट्या गव्हाचे पीठ घ्या.त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घाला. तसेच त्यामध्ये ओवा,कसुरी मेथी, कलोंजी चवीनुसार मीठ,अर्धा चमचा हळद आणि धना जिरा पावडर तसेच एक चमचा तूप घालून सर्व पीठ एकजीव करून घ्यावे.यानंतर पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यावे.आणि १५ मिनिटे पिठावर ओले कापड ठेवावे.तोपर्यंत पराठ्यासाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करून घ्यावी. यासाठी २ वाट्या हिरवे वाटणे धुवून घ्या. यानंतर एका कढईमधे २ चमचे तेल घ्या.त्यामध्ये मोहरी जिरे टाका. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये वाटाणे परतून घ्यावेत.आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ,अर्धा चमचा हळद ,लाल तिखट,आमचूर पावडर हे सर्व जिन्नस त्यामध्ये घाला. यानंतर त्यामध्ये आले लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे.यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी .आणि कढईवर झाकण ठेवून १० मिनिटे वाटाणे वाफवून घ्यावेत. वाटाणे थंड झाल्यावर रवीच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यावेत.आत्ता तयार झालेल्या सारणाचे गोळे करून घ्यावेत.कणकेच्या पिठाची गोल वाटी करून घ्यावी आणि वाटाण्याचे सारण भरून लाटून घ्यावेत. यानंतर तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यावेत. तयार झालेले गरमगरम चविष्ट मटार पराठे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.
Related Posts
Add A Comment