रोजची साधी आणि सारख्याच चवीची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि रोज नवीन काय बनवणार असा प्रश्न गृहिणींना पडतो. रोजच्याच भाज्यांमुळे चविष्ट पदार्थ करण्याची मागणी होते.अशा परिस्थितीत, आपण घरी ताजे सुगंधी मसाले तयार करू शकता. ज्यामुळे भाज्यांना वेगळी चव येऊ शकते.
साहित्य
२ चमचे जिरे
२ चमचे धणे
२ चमचे काळी मिरी
२ चमचे हळद
२ चमचे लाल तिखट
१ तुकडा दालचिनी
चिमूटभर हिंग
आमचूर पावडर
१ चमचा कॉर्न फ्लोअर
कृती
सर्व प्रथम कढईत धणे, जिरे भाजून घ्या. नंतर त्यात हळद, दालचिनी, काळी मिरी घालावी. सर्व मसाले थोडे गरम करावे. कसुरी मेथी थोडी गरम करा. सर्व मसाले ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करा. आता ते एका प्लेटमध्ये काढा आणि त्यात कॉर्न फ्लोअर, आमचूर पावडर, लाल तिखट, हिंग घालून मिक्स करा आणि एअर टाईट डब्यात ठेवा. गरज असेल तेव्हा भाजीत घालून चव वाढवा.
Previous Articleझटपट होणारी उपवासाची इडली
Next Article केसात वारंवार गुंता होतोय?मग फॉलो करा या टिप्स
Related Posts
Add A Comment