Raj Thackeray : मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष मनिष धुरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे.त्यामुळे मनसेत खळबळ उडाली.धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार याचीही चर्चा सध्या रंगली आहे .मनसेच्या अनेक आंदोलनात आक्रमक सहभाग नोंदवणाऱ्या मनिष धुरी यांनी अचानक राजीनामा का दिला असा ही सवाल उपस्थित केला जात आहे.
काय म्हटलय पत्रात
वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत आहे. पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल,अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचं ही त्यांनी म्हटलयं. शिवाय पक्षानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज ठाकरे यांचे मनिष धुरी यांनी आभार मानले आहेत.
Previous Articleआंबोली सह्याद्री पट्ट्यातील वाहणाऱ्या धबधब्यापासून नदीजोड प्रकल्प राबवणार – मंत्री केसरकर
Next Article मनसेच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Related Posts
Add A Comment