आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, चिकोडी पोलिसांची कारवाई सात जणांना अटक, यंत्रसामग्री-कच्चामाल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
बनावट पानमसाला तयार करून सरकारचा कर बुडविणाऱया आंतरराज्य टोळीचा चिकोडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कर्नाटक, तेलंगणा व दिल्ली येथील सात जणांना अटक करण्यात आली असून आरएमडी व विमल पानमसाला बनविणारे गुन्हेगारच नामवंत कंपन्यांची बनावट औषधेही तयार करीत होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार या वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, सदलग्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र अज्जण्णावर, अंकलीचे पोलीस उपनिरीक्षक भरत, विठ्ठल नायक, एस. एल. गळतगी, एस. पी. गलगली, एस. एच. देवर, आर. एन. मुंदीनमनी आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकाने मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कर्नाटकाबाहेरही पोलिसांनी कारवाई केली असून नवी दिल्ली येथील एका कारखान्यावर छापा टाकून लाखो रुपये किमतीची यंत्रोपकरणे जप्त केली आहेत.
ही सर्व उपकरणे चिकोडीला आणण्यात आली असून बनावट पानमसाला तयार करण्याबरोबरच आणखी कोणत्या औषध कंपन्यांच्या नावे बनावट औषधे तयार केली जात होती, याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मे 2022 रोजी आरएमडी पानमसाल्याचे उत्पादन घेणाऱया धारिवाल इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेडचे सेल्स मॅनेजर शीतल पाटील यांनी एकसंबा येथील बसवेश्वर सर्कलजवळ असलेल्या राजलक्ष्मी किराणा दुकानदाराला बनावट आरएमडी पानमसालाची विक्री करणाऱया मुज्जम्मिल नौशाद मुल्ला, रा. मुल्ला गल्ली, चिकोडी याच्यावर फिर्याद दिली होती. मुज्जम्मिलजवळून चौदा बॉक्स बनावट पानमसाला व त्यासोबत खरा पानमसालाही जप्त करून सदलगा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी एकसंबा येथे ताब्यात घेण्यात आलेला बनावट पानमसाला तयार कुठे होतो? याचा शोध घेण्यास प्रारंभ केला. याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच चिकोडी पोलिसांनी दिल्लीत धडक मारली. केवळ आरएमडीच नव्हे तर विमल पानमसालाही बनावट तयार करण्यात येत होता. यामुळे सरकारला मोठय़ा प्रमाणात कराचा फटका बसत होता. त्यामुळे पोलिसांनी लाखो रुपयांची यंत्रसामग्री जप्त करून बनावट पानमसाला तयार करणाऱया टोळीच्या मुसक्मया आवळल्या आहेत.
दोन ट्रक भरून यंत्रसामग्री-कच्चामाल दिल्लीहून चिकोडीला आणला
या टोळीत कर्नाटकातील दोघेजण, तेलंगणातील दोघेजण व दिल्ली येथील तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन ट्रक भरून यंत्रसामग्री व कच्चामाल दिल्लीहून चिकोडीला आणला आहे. चौकशी पूर्ण करून पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आंतरराज्य टोळीच्या मुसक्मया आवळणाऱया पोलीस पथकाचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी कौतुक केले आहे.
पाच जणांना न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. रविंद्र गोविंदस्वामी, मूळचा राहणार विल्वानगर, तामिळनाडू, सध्या रा. बेंगळूर, अजयकुमार जागेश्वरप्रसाद शर्मा, मूळचा रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. सिकंदराबाद-हैदाबाद, सय्यद खाजी कायदेआझम, रा. मल्लेपल्ली, हैद्राबाद, जावेद खान दिलफराज खान, रा. शिशमहाल तेलीवाडा, दिल्ली, रसायतअली लटफहुसेन, रा. गालंबीवाली, अहताकिडारा, दिल्ली अशी त्यांची नावे आहेत. या पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून आणखी दोघा जणांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.