लिव्हइनमध्ये राहत असल्याची चर्चा
माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त समोर येत ओ. 2017 मध्ये विश्वसुंदरीचा मान मिळविणारी मानुषी आता उद्योजक निखिल कामतला डेट करत आहे. निखिल हा फायनान्शियल कंपनी जेरोधाचा सहसंस्थापक आहे. दोघेही परस्परांना 2021 पासूनच डेट करत आहेत. दोघांचे कुटुंबीयही परस्परांना चांगल्याप्रकारे ओळखत असल्याचे समजते.
मानुषी अन् निखिल आता लिव्हइनमध्ये राहत असल्याची चर्चा आहे. मानुषीने सध्या पूर्ण लक्ष बॉलिवूडमधील कारकीर्दीवर केंद्रीत केल्याने तिला या रिलेशनशिपची अधिक चर्चा होणे नको असल्याचे समजते.

निखिल कामत हा घटस्फोटीत आहे. 2019 मध्ये त्याने इटलीतील फ्लोरेन्स शहरात अमांडा नावाच्या महिलेसोबत विवाह केला होता. परंतु एका वर्षाच्या आतच दोघेही विभक्त झाले होते. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.
मानुषी 2017 मध्ये विश्वसुंदरी ठरली होती. प्रियांका चोप्रानंतर सुमारे 17 वर्षांनी भारतीय मॉडेलने हा मान पटकाविला होता. मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी मानुषी वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने चालू वर्षी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता.