शहरातील विविध भागात गटारे उघडय़ावर
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील कासटमार्केट परिसरात असणाऱया भाजी मंडईच्या प्रवेशद्वारात असलेल्या गटारावरचे झाकण उघडे झाले आहे. यामुळे अपघात होऊन प्रसंगी जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खूप दिवसापासून हे गटाराचे झाकण उघडे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
या भाजी मंडईत दररोज हजारोच्या संख्येने ग्राहक भाजी खरेदीसाठी येतात. सोबत लहान मुले असतात. तर ग्रेड सेपरेटर मधून, शेजारील अरूंद रस्त्याने वेगात वाहने येतात. यावेळी नजर चुकीने या गटारात पडून अपघात होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा नगरपालिकेचे कर्मचारी दररोज मंडईत कचरा उचलण्यासाठी येतात. ही बाब अनेक वेळा कर्मचाऱयांच्या निदर्शनास आली आहे. तरीही गटारावरचे झाकण बंद करण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. भाजी मंडई संघटनेचे पदाधिकारी ही याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अपघात झाल्यावर संबंधित प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
इतर भागातील गटारे उघडयावर
कासटमार्केट परिसरातील गटार जसे उघडय़ावर आहे. तशीच अवस्था शहरातील जिल्हा परिषद, राधिका रोड, मंगळवार पेठ, बसाप्पा पेठ व इतर भागात आहे. गटरे उघडय़ावर असून ती पावसाने तुंबली आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.