निव्वळ नफा 2,351 कोटी रुपयांच्या घरात
नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीचा निव्वळ नफा हा मागील तीन महिन्यात दुपटीने वधारला आहे, अशी माहिती कंपनीने नुकत्याच सादर केलेल्या तिमाही अहवालामधून देण्यात आली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने 2,351 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एका वर्षापूर्वीच्या डिसेंबर तिमाहीत 1,011 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यापेक्षा हा दुप्पट आहे.
2022 मध्ये 19.40 लाख वाहन विक्री
मारुतीने 2022 मध्ये एकूण विक्रीची सर्वोच्च पातळी ओलांडली. कंपनीने या कालावधीत 19,40,067 वाहनांची विक्री केली. निर्यातही 2,63,068 युनिट्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या कालावधीत एकत्रित उत्पादन 2.5 कोटी युनिट्सच्या विक्रमी पातळीवर आहे.