किंमत वाढली 27 हजाराने ः ई-20 पेट्रोलवर धावणार
वृत्तसंस्था/ मुंबई
मारुती सुझुकी इंडिया कंपनीने आपल्या इग्निस या सुधारीत मॉडेलला सादर केले असून तिच्या किमतीमध्ये 27 हजार रुपयांची वाढ केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार ही कार ई-20 पेट्रोल इंधनावर धावू शकणार आहे.
सदरची वाढीव किंमत तात्काळ लागू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी मारुती सुझुकीने 16 जानेवारीला आपल्या सर्व प्रकारातील कार्सच्या किमती 1.1 टक्के वाढविल्या होत्या. आता कंपनीने सर्व प्रकारच्या कार्समध्ये सुरक्षिततेची वैशिष्टय़े समाविष्ट केली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स स्टेबिलिटी प्रोग्रॅम आणि हिल होल्ड असिस्ट यासारख्या सुरक्षित वैशिष्टय़ांचा समावेश करण्यात आला आहे. रियल ड्रायव्हिंग इमिशन या नव्या नियमावलीनुसार कार सुधारीत करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची एक्स शोरुम किंमत 5.5 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. यातील टॉप व्हेरिएंट प्रकारातील कारची किंमत 7.9 लाख रुपये असणार आहे.
इतर वैशिष्टय़े….
5 स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी गिअरबॉक्स या गाडीला असणार असून 20.89 किमी प्रती लिटर मायलेज ही कार देणार आहे. अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले इन्फोटेंमेन्ट सिस्टिम यात असणार असून डय़ुअल एअरबॅग, एबीएस, टीबीडी, सीटबेल्ट प्री-टेंशनर आणि गाइडिंग लाईनसह रिव्हर्सिंग पार्किंग कॅमेरा या सुविधाही यात असतील.