प्रतिनिधी / बेळगाव : अनगोळ येथील एका मटकाबुकीला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सोमवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
19 सप्टेंबर 2022 ते 18 सप्टेंबर 2023 पर्यंत एक वर्षासाठी त्याला बेळगाव जिल्ह्यातून तडीपार केल्याचा आदेश पोलीस उपायुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी रविंद्र गडादी यांनी बजावला आहे.