Mehbooba Mufti : जम्मू- काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतरही अजूनही विधानसभेच्या निवडणूका झाल्या नाहीत. त्यातच मतदार संघांची पुर्नरचना करण्यात आली आहे. जवळपास ७ मतदार संघ वाढले आहेत.त्य़ातच कामानिमित्त वास्तव्य करणारे, परप्रांतीय, जवान हे आता काश्मीरमध्ये मतदान करू शकतात असा आदेश निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यामुळे २५ हजार अधिक मतदार वाढणार असल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला आहे. चोर दरवाज्याने भाजप प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्य़ांनी केला आहे.
जम्मू- काश्मीरमध्ये २५ हजार मतदार वाढणार असल्याने स्थानिक पक्षांनी आक्षेप घेतला आहे. जर बाहेरचे लोक वाढले तर स्थानिक नागरीकांचे प्रतिबिंब मतदानावेळी उमटणार नाही. तसेच इतर पक्षांचा राजकीय अजेंडा सहजपणे त्यांना राबविता येईल असे मुफ्ती यांचे मत आहे. काश्मीरमध्ये दुसऱ्या राज्यातील लोक मतदान करणार आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
३७० कलम हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरला कोणताही विशेष दर्जा प्राप्त होत नाही. इतर राज्यात जर अधिकार असतील तर जम्मू- काश्मीरमध्ये का नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी घेतलेला आक्षेप कसा टिकतोय हे पाहावं लागेल.
Related Posts
Add A Comment