वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील आठ ते बारा महिन्यांच्या कालावधीत मर्सिडिज बेंज भारतामध्ये चार इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे मुख्य माथियाज लुहर्स यांनी ही माहिती दिली आहे. 20 पैकी 4 इलेक्ट्रिक कार्स सध्या भारतामध्ये विक्री होत आहेत. सदरच्या जर्मनीतील कंपनीचा भारतामध्ये निर्मिती कारखाना उभारण्याचा कोणताही इरादा नसल्याचेही लुहर्स यांनी सांगितले. पुढील पाच ते आठ वर्षासाठी जागतिक स्तरावर कार निर्मिती करण्याकरिता आवश्यक ती उत्पादन क्षमता कंपनीकडे आहे, असेही त्यांनी म्हटले.
लक्झरी कारच्या बाबतीमध्ये 44 टक्के वाटा घेत भारतामध्ये मर्सिडिज अग्रस्थानी राहिली आहे. 2022 सालचा विचार करता कंपनीने 38,000 लक्झरी वाहनांची विक्री केली आहे. सध्याच्या काळामध्ये जागतिक स्तरावर उत्पादनात वाढ करण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागणीनुसार उत्पादनावर भर दिला जात असून त्याप्रमाणे पुढील पाच ते आठ वर्षांत जागतिक स्तरावर उत्पादित करण्याएवढी क्षमता कंपनीकडे निश्चितच आहे.