घरी अचानक पाहुणे आले की त्यांना खायला काय करावे असा प्रश्न नेहमीच पडतो. किंवा तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज मेथीची वडी हि रेसीपी कशी करावी हे जाणून घ्या. मेथी पासून आपण पराठे, लाडू, भाजी बनवतो. पण मेथी सारखी खाल्याने कंटाळा येतो. अशावेळी वडी ट्राय करा. हि वडी तुम्ही चहासोबतही खाऊ शकता. किंवा जेवणासोबतही खाऊ शकता.
साहित्य
चिरलेली मेथी – २ वाट्या
गव्हाचं पीठ-२ वाटी /मैदा
रवा-अर्धी वाटी
जिरे-धने- पूड एक-एक चमचा
दिड चमचा गूळ
चार मिरच्या, जिरे अर्धा चमचा
एका लिंबाचा रस
हिंग, मोहरी, लाल चिखट वाळलेल्या मिरच्या
कृती:
सुरुवातीला चिरलेली मेथी, गव्हाचं पीठ, रवा, मीठ, हळद, धना-जिरा पावडर, गुळ, लाल तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिरचीचं केलेल वाटण घाला. आता थोडसं तेल घालून थोडं-थोडं पाणी घालून मळून घ्या. हे पीठ १० ते १५ मिनिटे झाकूण ठेवा. यानंतर रवा थोडा मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता गोळे तयार करून पारी लाटून घ्या. पारी लाटण्यासाठी रव्याचा वापर करा. अशा पध्दतीने पाऱ्या लाटून घ्या. त्या एकमेकावर एक ठेवा. त्यानंतर त्याची वरळी करून घ्या. ती एकसारखी करून घ्या. त्यानंतर उकड करून घ्या. ती वरळी गार झाल्यावर त्याचे पीस कट करून शालो फ्राय करून घ्या. किंवा तसेच खाऊ शकता. हि वडी तुम्ही चहा सोबत किंवा जेवणासोबत खाऊ शकता.
Previous Articleजिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथके दाखल
Next Article ‘त्या’ 22 शाळांना शनिवारीही सुट्टी
Related Posts
Add A Comment