Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्ताधाऱ्यानी दूध उत्पादकांची पहिली दिवाळी दणक्यात आणि जोरात करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा दूध उत्पादकांना १०२ कोटी ८३ लाखाचा फरक दिला जाणार आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यंदा गतसालच्या तुलनेत 19 कोटी रुपये इतकी ज्यादा रक्कम मिळणार आहे. अशी माहिती गोकुळचे नेते, माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघांचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.
यंदा सत्ताधाऱ्यांनी बचतीचे धोरण राबवल्याने टँकर वाहतूक, रोजंदारी कर्मचारी कपात, महानंदा पॅकिंग खर्च बचत, दूध वाहतूक टेम्पो भाडे कपात, दूध पावडर विक्री नफा या सर्व बचतीतून १७ लाख तर दरफरकातील ६%, महिन्याचे व्याज ६२ लाख रुपये, डीबेचर्स व्याज ६ % प्रमाणे १५ लाख, संस्था डीव्हीडंड ११ %प्रमाणे ६५ लाख असे एकूण १९ कोटी ४ लाख ज्यादाची मिळणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Previous Articleगोवा फाऊंडेशनला 50 हजारांचा दंड
Next Article आमदार युरी आलेमाव यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती
Related Posts
Add A Comment