प्रतिनिधी/खानापूर
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा वाढदिवस सोमवारी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता येथील नगरपंचायतच्या समुदायभवनात मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार निंबाळकर यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. त्यानंतर सरकारी इस्पितळात रुग्णांना फळेवाटप करण्यात आली. तसेच शहरातील सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळेवाटप करण्यात आली.
दुपारी 1 वाजता येथील शनाया पाल्म येथे वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव कोळी यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. त्यानंतर संजीव वाटुपकर, हेमंत निंबाळकर, रियाज अहमद पटेल, महांतेश राऊत, रकमा हेमंत निंबाळकर यासह अनेकांची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक वर्ग, कार्यकर्त्यांसह तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आमदार अंजली निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.