ग्रामीण भागात एकी निर्माण करून विकास पर्वाला सुरु करत प्रामाणिकपणे विनाविश्रांती कार्य करीत असून गेल्या ५ वर्षात जनहितालाच श्वास बनविले आहे. ग्रामीण भागातील जनताच यासाठी जिवंत साक्षी असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
ग्रामीण क्षेत्रातील हिंडलगा , मराठा कॉलनी येथे शहरीय विकास प्राधिकरणाच्या ५० लाख रुपये अनुदानातून उद्यान निर्माण कामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली. यावेळी येथील स्थानिक महिलांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करून आभार मानले.
तसेच हिंडलगा जयनगर येथे शहरीय विकास प्राधिकरणाच्या ३२ लाख रुपये अनुदानातून उद्यान निर्माण कामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चालना दिली.
या प्रसंगी युवा नेते मृणाल हेब्बाळकर, कपिल सांबरेकर, संजय कदम , राहुल उरणकर व इतर उपस्थित होते.
त्यानंतर हिंडलगा विद्यानगर को ऑपरेटिव्ह हौसिंग कॉलनीत ४२ लाख रुपये अनुदानातून नूतन उद्यान निर्माण कामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले.
या प्रसंगी एस एस पाटील , रवी पाटील, भास्कर वन्नुरकर, अमर घोरपडे, राजू पादगुरी, सुधीर काकतकर व इतर उपस्थित होते.
हिरेबागेवाडी गावात मुस्लिम समाजासाठी नूतन समुदाय भवन निर्माण कामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरुवात करून भूमिपूजन केले.
या प्रसंगी एमएलसी चन्नराज हट्टीहोळी,अश्रफपीर काद्री, स्वाती इटगी, नाझरीनबानू करीदावल , सीसी पाटील, सुरेश इटगी, अडिवेश इटगी व इतर सहभागी झाले होते.