बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील बागेवाडी क्रॉस ते भेंडिगेरी पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २. ५० कोटी रुपयाच्या निधीतून करण्यात येत असलेल्या रस्ता विकास कामाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी चालना दिली.

याप्रसंगी बोलताना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले ग्रामीण भागातील जनता सहनशील व प्रामाणिक आहे. प्रामाणिक कोण आहेत हे ओळखले पाहिजे. ग्रामीण भागातील जनेतला खोटे बोलून त्यांचे दिशाभूल करू नये. यंदाच्या निवडणुकीत लक्ष्मी हेब्बाळकर यांना बहुमताने विजयी करण्याचे संकल्प करूया असे आवाहन केले.
यावेळी प्रकाश पाटील, रवी मेळेद, सिद्धण्णा हावन्नवर, ब्रह्मा दोडमनी, बालिश माडलगी, बसम्मा चौहान व इतर सहभागी झाले होते.
तसेच बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील चव्हाट गल्ली, कंग्राळी बी के येथे १. २१ कोटी अनुदान गटार निर्माण करण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर करवून घेतले असून काँग्रेस युवा नेते व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी विकास कामाला चालना दिली.

बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक गावात विकास कामे झाले आहेत. बेळगावच्या इतिहासातच असे विकास पर्व पाहायला मिळाले नव्हते.त्यामुळे आगामी वाढीसाठी देखील लक्ष्मी हेब्बाळकर यांनाच आपले पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी दत्ता पाटील, अर्चना पाटील, सदेप्पा राजकट्टी, जयराम पाटील, शंकर अष्टेकर व इतर सहभागी झाले होते.